27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रभिवंडीत ३५ लाख रुपयांचा ‘कफ सिरप’साठा जप्त

भिवंडीत ३५ लाख रुपयांचा ‘कफ सिरप’साठा जप्त

एकमत ऑनलाईन

मुंबई : भिवंडी परिसरात मुंबई एनसीबीने कफ सिरपच्या साठ्यावर मोठी कारवाई केली आहे. एनसीबीच्या मुंबई युनिटने भिवंडी परिसरातून नशेसाठी वापरल्या जाणा-या कफ सिरपचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ८ हजार ६४० सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. कफ सिरपचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान या प्रकरणी एनसीबीने दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींची पुढील चौकशी करण्यात येत आहे. मिळालेली माहिती अशी की, एनसीबी मुंबई युनिटने भिवंडी परिसरातून नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरपचा साठा जप्त केला आहे. भिवंडीतील आग्रा-मुंबई महामार्गावर हा साठा एका गाडीतून येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार एका संशयित बोलेरो पिकअपची एनसीबी अधिका-यांनी झडती घेतली.

यावेळी वाहनातील ६० बॉक्समध्ये एकूण ८६४ किलो (८,६४० बाटल्या) कोडीन आधारित कफ सिरप भरलेले आढळले. या छाप्यात जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत ३५ लाख रुपये आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एनसीबी अधिकरी या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या