23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये बनावट नोटा छापणा-या टोळीचा पर्दाफाश

नाशिकमध्ये बनावट नोटा छापणा-या टोळीचा पर्दाफाश

एकमत ऑनलाईन

नाशिक : कलर ंिप्रंिटगचा व्यवसाय बंद असल्याने चक्क बनावट नोटांचा छापखाना सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. नाशिक पोलिसांनी हा छापखाना उद्ध्वस्त केला असून या प्रकरणात एकूण सात जणांना अटक केलं आहे. नाशिकमधील सुरगाणा तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार आहे. या छापखान्याचे धागेदोरे लासलगाव जवळील ंिवचूरपर्यंत असल्याचेही पोलिसांना समजले आहे. अटक केलेल्या आरोपींनी या छापखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो बनावट नोटा छापल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार कोरोना तसेच लॉकडाऊनमुळे नाशिकमधील काही तरुणांचा रोजगार गेला. कलर प्रिटिंगचा व्यवसायही ठप्प झाला होता. हाताला काम नसल्यामुळे या तरुणांनी चक्क नोटांचा छापखाना सुरु केला. या छापखान्यात आरोपी वेगवेगळ्या बनावट नोटा छापत होते. मागील तीन महिन्यांपासून बनावट नोटा छापण्याचे काम या तरुणांकडून सुरु होते.

बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट
विशेष म्हणजे नोटा छापण्याचे तसेच त्या बाजारात आणण्याचे काम अगदी नियोजनबद्ध पद्धतीने केले जायचे. मागील तीन महिन्यापासून दैनंदिन व्यवहारात बनावट नोटा आणल्या जात होत्या. मात्र हा प्रकार समोर यायला जास्त वेळ लागला नाही. आजूबाजूच्या व्यापा-यांना आमच्याकडे बनावट नोटा येण्याचे प्रमाण वाढल्याचे समजले आणि आरोपींच्या कारनाम्याचा पर्दाफाश झाला.

नोटा छापण्याचे जाळे विंचूरपर्यंत पसरले
नाशिकच्या व्यापा-यानी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसां नी या प्रकाराची गंभीर दखल घेत बनावट नोटांच्या छापखानाचा पर्दाफाश केला. सुरगाणा तालुक्यातीला हा धक्कादायक प्रकार आहे. मात्र हे जाळे लासलगाव जवळील विंचूरपर्यंत पसरले असल्याचे सांगितलं जात आहे. तसा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

राजकीय क्षेत्रातही खळबळ
दरम्यान, या कारवाईत नाशिक पोलसांनी एकूण सात जणांना अटक केली आहे. कलर ंिप्रटरचा व्यवसाय बंद असल्याने बनावट नोटा छापण्याचं धाडस अटक केलेल्या लोकांनी केलं आहे. या घटनेमुळे गुन्हेगारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याशिवाय राजकीय व्यक्तीचा यामध्ये काही हस्तक्षेप आहे का ? याचादेखील तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातदेखील खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या