25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeमहाराष्ट्रकोर्टातली लढाई मला नवीन नाही - राऊत

कोर्टातली लढाई मला नवीन नाही – राऊत

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनपाने कंगनाचे कार्यालय पाडल्यानंतर आता कंगना रणौतने शिवसेना नेते संजय राऊत यांना कोर्टात खेचण्याची तयारी केली आहे. मात्र, खटल्यामध्ये प्रतिवादी करण्याची मागणी हास्यास्पद असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. याचबरोबर आम्ही कोणतीही लढाई लढण्यास तयार आहोत, मला कोर्टाची लढाई माझ्यासाठी नवी नाही. असेही त्यांनी म्हटले आहे. कंनगा रणौत यांच्या वकीलांच्या मते संजय राऊत यांच्यामुळे बीएमसीला कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करावी लागलेली आहे.

‘‘ आम्ही कोणतीही लढाई लढायला तयार आहोत. कोर्टाची लढाई मला नवीन आहे का? १६० खटले माझ्यावर सुरू होते. महाराष्ट्रातील असे कोणतही कोर्ट नाही जिथे संजय राऊतवर केस पडली नाही.१९९२ ची दंगल, बाबरी प्रकरण, मराठी माणसांच्या लढ्यामध्ये आंदोलन आणि संघर्ष हा आमचा आत्मा आहे. कोर्ट-कचे-या या होतचं असतात.’असे संजय राऊत म्हणाले आहेत.

कंगना रणौत प्रकरणात संजय राऊत यांना प्रतिवादी करण्यात आलेलं आहे. कंनगा यांच्या वकीलांच्या मते संजय राऊत यांच्यामुळे बीएमसीला कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करावी लागलेली आहे.यावर बोलतांना संजय राऊत म्हणाले, ‘हे हास्यास्पद आहे. शेवटी आपल्याकडे न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाला व निर्णयाला झुकून तो मान्य करण्याची परंपरा आहे. न्यायालयाचा नेहमी मान राखला जातो, तसा आताही राखला जाईल. बेकायदेशीर बांधाकाम जर कुठं झालं असेल, तर ते तोडण्यासंदर्भात महापालिकेचा अधिकार आहे.’

षटकारांची आतषबाजी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या