23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रकंगनाविरोधात एफआयआर दाखल करा न्यायालयाचा मुंबई पोलिसांना आदेश

कंगनाविरोधात एफआयआर दाखल करा न्यायालयाचा मुंबई पोलिसांना आदेश

धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न ; बहीण रंगोलीवरही संकट

एकमत ऑनलाईन

मुंबई : सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना हा आदेश दिला असून यामुळे कंगनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंगनाची बहिण रंगोलीविरोधातही एफआयआर दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. कंगना आणि रंगोली ट्विट करीत आणि मुलाखतींच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप आहे.

वांद्रे कोर्टात कंगनाविरोधात दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय ती हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढही निर्माण करत आहे, असा आरोप करण्यात आला आहे. कंगना वारंवार आक्षेपार्ह ट्विट करत असून यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असेही याचिकेत म्हटले आहे. याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडीओ सादर केले. त्यानंतर कोर्टाने कलम १५६ (३) अंतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

याचिकाकर्त्यांनी प्रथम वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पण पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही. त्यामुळे त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. यावेळी कोर्टाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल करावयाचा आदेश दिला.

कोरोना नियंत्रणासाठी सांगोला नगरपरिषदेकडून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेच्या ‘दुसऱ्या’ फेरीस प्रारंभ

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या