24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रअनिल परब साईंच्या दरबारी

अनिल परब साईंच्या दरबारी

एकमत ऑनलाईन

शिर्डी : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. मात्र, अनिल परब यांनी शिर्डीत साईबाबांच्या दरबारात हजेरी लावली. अनिल परब हे साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला उपस्थित राहणार आहेत. अनिल परब यांचा दौरा हा पूर्वनियोजित होता. आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे आज ते ईडी चौकशीला हजर राहणार नसल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली होती.

अनिल परब यांना आज सकाळी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले होते. दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अनिल परब आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित ठिकाणी ईडीने छापा मारला होता.

दरम्यान, अनिल परब आज चौकशीला उपस्थित राहणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, अनिल परब हे पूर्वनियोजित कार्यक्रमांनुसार आज मुंबईबाहेर होते. त्यामुळे ते ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहू शकणार नसल्याची माहिती त्यांच्या वकिलामार्फत अधिका-यांना देण्यात आली असल्याची माहिती आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते समजले जातात. मागील काही महिन्यांपासून अनिल परब ईडीच्या रडारवर आले आहेत.

काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल परब यांच्या खासगी आणि शासकीय निवासस्थानावर छापा मारला होता. त्याशिवाय अंधेरीतील शिवसेना पदाधिका-याच्या घरीदेखील छापा मारला होता. त्यावेळी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी जवळपास १२ तास ठाण मांडून होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या