24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रआता महाराष्ट्रातही होणार कोव्हॅक्सिनची निर्मिती

आता महाराष्ट्रातही होणार कोव्हॅक्सिनची निर्मिती

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारत बायोटेककडून पुणे जिल्ह्यात २८ एकर जमिनीची मागणी करण्यात आली असून आता महाराष्ट्रातही कोव्हॅक्सिनची निर्मीती लवकरच सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार दि़ १४ मे रोजी पुणे येथे प्रसारमाध्यमांना दिली़ दरम्यान, २८ एकर जमीन तातडीने देण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. भारत बायोटेकचे लस उत्पादन सुरू होण्यासाठी अद्याप ३ महिने लागेल मात्र, आवश्यक त्या सर्व गोष्टी त्यांना तातडीने उपलब्ध करून देण्याचे काम केले जात असल्याची माहिती पवार यांनी दिली़

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थिती आढावा बैठक घेतली. यावेळी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी राज्यातील कोरोनास्थिती, लसीकरण कार्यक्रम, म्युकरमायकोसीस, कोरोनाची तिसरी लाट आणि या तिस-या लाटेत लहान मुलांना असलेला धोका या सर्व आरोग्यविषयक स्थितीवर भाष्य केले आहे. या सगळ्या आव्हानांसाठी राज्य सरकारने कशा पद्धतीने तयारी केली आहे, याबाबत अजित पवार यांनी माध्यमांना महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. राज्याला लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तूर्तास थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ४५ वरील वयोगटातील ज्या लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे़ अशांना दुसरा डोस देण्याचे प्राधान्य सध्या राज्य सरकारपुढे आहे.

तिस-या लाटेत लहान मुलांना धोका
कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेबाबत राज्य सरकार नियोजन करत आहे. या तिस-या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे, यावेळी आरोग्य सुविधा आणि औषधांचा कोणत्याही पद्धतीचा तुटवडा भासणार नाही याच दृष्टीने राज्य सरकार उपाययोजना करत आहे. ऑक्सिजन उपलब्धतेबाबत बोलायचे झाले तर सद्यस्थिती राज्यात १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होत असून, यापुढे राज्य सरकारचे ३००० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्धतेचे लक्ष्य आहे.

म्युकरमायकोसीस हा संसर्गजन्य रोग नाही
राज्य सरकार म्युकोरमायकोसीसवरील औषधांचा काळा बाजार होऊ नये याची खबरदारी घेणार आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात औषध उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेत म्युकरमायकोसीसचे उपचार मोफत होणार आहेत. तज्ज्ञांच्या मते म्युकरमायकोसीस हा संसर्गजन्य रोग नाही.

बारावीची परीक्षा रद्द करण्याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या