24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रसध्या मुंबईकरांना लोकलचा प्रवास नाही?

सध्या मुंबईकरांना लोकलचा प्रवास नाही?

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार यावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोना संपल्याशिवाय मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होणार नसल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वांनाच लोकल कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागली आहे. विजय वडेट्टीवार यांना मुंबईची लोकल कधी सुरू होणार असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरू होणार नसल्याचे म्हटले आहे. वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

महापौर काय म्हणाल्या
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती देत लोकलसंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईतील कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. रुग्णसंख्या कमी झाली की विचार करू. त्यानंतर सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासास परवानगी देण्याचा विचार करावाच लागेल, असे महापौर म्हणाल्या. तसेच तिसरी लाट आली, तर ती सगळ्यांसाठी भयंकर असेल, असा इशाराही महापौरांनी दिला आहे.

मुंबई पालिका आयुक्त काय म्हणाले
मुंबई संसर्ग दरात पहिल्या स्तरात आणि ऑक्सिजन बेड्सच्या प्रमाणात दुस-या स्तरात येत आहे. असे असले तरी, मुंबईत सध्या तरी तिस-या स्तरातील निर्बंध कायम राहणार असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. तसेच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यावर टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले़

तिसरी लाट येण्याची शक्यता : काकाणी
तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य मंत्रालयाकडून वर्तवण्यात आली आहे. सर्व निर्बंध शिथिल करून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करणे धोकादायक ठरू शकते, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटले आहे. पालिकेकडून सावध पावले उचलली जात आहेत. शहरातील रुग्णसंख्येत घट झाली असल्याने पुढच्या आठवड्यासाठी काही निर्बंध शिथिल करण्यावर येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे सुरेश काकाणी यांनी सांगितले.

सलग दुस-यावर्षी अमरनाथ यात्रा रद्द

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या