26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रदहीहंडीला मिळणार खेळाचा दर्जा

दहीहंडीला मिळणार खेळाचा दर्जा

एकमत ऑनलाईन

मुंबई : दहीहंडी या धार्मिक उत्सवाला आता खेळाचा दर्जा मिळणार आहे. राज्य सरकारने याबाबत महत्वाचा निर्णय घेतला असून उद्या याबाबत विधानसभेत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार आता प्रो कबड्डीच्या धर्तीवर प्रो दहीहंडी हा खेळ सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांकडून कळते.

गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीच्या मंडळांकडून दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याबाबत गुरूवार दि. १८ ऑगस्ट रोजी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी दहिहंडीला खेळाचा दर्जा द्यावा तसेच दहिहंडीदिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

या ऐतिहासिक निर्णयामुळे वर्षातून एकच दिवस होणा-या दहीहंडीच आता वर्षातील ३६५ दिवस आयोजन करता येणार आहे. तसेच दहीहंडीमध्ये मानवी मनोरा रचणारे गोंिवदा आता खेळाडू म्हणून ओळखले जातील. उद्या विधानसभेत याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या