34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रशिवसेनेकडून जिवाला धोका; कंगनाची सुप्रीम कोर्टात धाव

शिवसेनेकडून जिवाला धोका; कंगनाची सुप्रीम कोर्टात धाव

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये दाखल करण्यात आलेले तिन्ही खटले हिमाचल प्रदेशमधील न्यायालयात हलवण्यात यावेत अशी मागणी कंगनाने केली आहे.शिवसेनेच्या नेत्यांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा कंगना राणावतने केला आहे. कंगनावर तीन खटले सुरू आहेत. वादग्रस्त ट्विट केल्या प्रकरणी कंगनावर खटला सुरू आहे.

अली काशिफ खान आणि मुनव्वर अली सय्यद यांनी दोन खटले दाखल केले आहेत. यामध्ये कंगनाच्या ट्विटमुळे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण केला जाण्याचा आरोप करण्यात आला आहे. तर तिसरा खटला हा गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केला आहे. जुहू पोलिस ठाण्यात कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी तक्रार केली होती. कंगनाने मानहानी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जावेद अख्तर यांनी अंधेरी कोर्टात कंगनाविरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. एका मीडिया चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने आपली बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कंगना आणि रंगोलीने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. जर मुंबईत या प्रकरणाची सुनावणी सुरू राहिली तर शिवसेनेच्या नेत्यांकडून आपल्या जिवाला धोका आहे. त्यामुळे या तिन्ही प्रकरणावरील सुनावणी ही हिमाचल प्रदेशमधील न्यायालयात व्हावी, अशी मागणी कंगनाने या याचिकेतून केली आहे. अद्याप ही याचिका स्वीकारण्यात आलेली नाही.

पक्षाने आमदारकी दिली; नेटाने काम कर – चित्रा वाघ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या