29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home महाराष्ट्र दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर

दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर

एकमत ऑनलाईन

मुंबई: कोरोना संसर्गामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा-महाविद्यालये सुरु झाली नव्हती. मात्र तरीही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्यसरकारने १० वी व १२वीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय जाही रकेला आहे. नेहमीपेक्षा काही उशिराने म्हणजे २३ एप्रिलपासून बारावी तर २९ एप्रिलपासून १० वी ची परीक्षा घतली जाईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

इयत्ता १२ वी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ या दरम्यान घेतली जाणार असून या परीक्षेचा निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर केला जाईल. तर इयत्ता १० वीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ च्या दरम्यान घेतली जाणार आहे. तर या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे.

गेल्या वर्षभरापासून देशासह राज्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असल्याने यावेळी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे काय होणार? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला होता. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही वारंवार याबाबत विचारणा करण्यात येत होती. दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत योग्य वेळी निर्णय जाहीर केला जाईल, असे ते सांगत होते. अखेर आज निर्णय जाहीर करण्यात आला.

देशात आतापर्यंत ८,०६,४८४ लोकांचे लसीकरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या