33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home महाराष्ट्र 10 जुलै पर्यंत मुदत : ऑनलाईन रोजगार मेळाव्याद्वारे कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार

10 जुलै पर्यंत मुदत : ऑनलाईन रोजगार मेळाव्याद्वारे कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने दुसरा ऑनलाईन रोजगार मेळावा घेण्यात येणार असून यासाठी विविध कंपन्यामध्ये 485 पेक्षा अधिक पदे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या मेळाव्यासाठी पसंतीक्रम नोंदविण्याकरीता येत्या 10 जुलै पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

करोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील लॉकडाऊनमुळे असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नामांकित कंपन्यामधील विविध प्रकारच्या रिेक्तपदांद्वारे नोकरी इच्छुक उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे.

या ऑनलाईन रोजगार मेळाव्याअंतर्गत उद्योजकांकडील वेल्डर, फिटर, टर्नर, इलेक्‍ट्रीशियन, मशिनिस्ट, पीपीओ यासारखे आयटीआय ट्रेड, हेल्पर, रीगर, इंजीनिअरींग डिप्लोमा इन इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इलेक्‍ट्रीकल, मेकॅनिकल, ऑटोमोटिव्ह, प्रॉडक्‍शन तसेच सेफ्टी ऑफीसर या सारख्या पदांसाठी आवश्‍यक ती अल्पशिक्षित, एसएससी, एचएससी, पदवीधर उमेदवारांसाठी रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी दिली आहे.

हा मेळावा ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी युझर आयडी व पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदांसाठी आपला पसंतीक्रम व उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी लागणार आहे. पसंतीक्रम नोंदविताना उमेदवारांनी वास्तव्यास असलेल्या ठिकाणाच्या आसपासच्या कंपन्यांची व आवश्‍यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदांची निवड करणे आवश्‍यक आहे.

मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस अलर्टद्वारे कळविण्यात येणार

‘रोजगार मेळाव्यात ऑनलाईन ऍप्लाय करणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. त्यामुळे ई-मेलद्वारे सादर केलेले अर्ज विचारात घेण्यात येणार नाहीत. ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस अलर्टद्वारे कळविण्यात येणार आहे. शक्‍य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येणार आहे.

-अनुपमा पवार(सहायक आयुक्त, पुणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र)

Read More  पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या