37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रडियर नीता भाभी और मुकेश भैय्या ये तो सिर्फ ट्रेलर है ;...

डियर नीता भाभी और मुकेश भैय्या ये तो सिर्फ ट्रेलर है ; अंबानींना पत्राद्वारे धमकी

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईतल्या मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन ने भरलेल्या स्फोटकांची कार आढळून आल्यामुळे खळबळ माजली आहे. या गाडीची बॉम्ब शोध पथकानं तपासणी केली असून यातून २० जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या आहेत. दरम्यान, स्फोटकांनी भरलेल्या गाडीमधून एक पत्रही जप्त करण्यात आले असून, या पत्रामधून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे.या प्रकारानंतर मुकेश अंबानी यांच्या घराजवळील सुरक्षेत वाढ झाली आहे.

गाडीत मिळालेल्या पत्रामध्ये काय लिहले होते?
या पत्रातून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे. ‘डियर नीता भाभी और मुकेश भैय्या और फॅमिली.. ये तो सिर्फ ट्रेलर है अगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे फॅमिली को उडाने..संभल जाना.’, असा मजकूर या पत्रात असल्याचे समजते.

अंबांनींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस कसून कामाला लागले आहेत. याप्रकरणाचा तपास सध्या गुन्हे शाखेकडे आहे. गुन्हे शाखेकडून या लोकांना शोधण्यासाठी ८ ते १० पथके तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याची पाहणी सुरु आहे.

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळली स्फोटकांनी भरलेली जीप

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या