28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमहाराष्ट्रदहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदा प्रथमेशचा मृत्यू

दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदा प्रथमेशचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईतील दहीहंडी उत्सवात गंभीर जखमी झालेल्या करी रोड येथील गोविंदाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. प्रथमेश सावंत असे या गोविंदाचे नाव आहे.

करी रोड येथील साईभक्त क्रीडा मंडळातील जखमी गोंिवदाचा गेल्या दीड महिन्याहून अधिक काळापासून संघर्ष सुरू होता. मात्र, आज (शनिवार) त्याची प्राणज्योत मालवली. गेल्या दोन महिन्यांपासून केईएम रुग्णालयात त्याच्यावर सुरु उपचार होते. प्रथमेशला मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री, मुंबई काँग्रेस आणि शिवसेनेनं पुढाकार घेतला होता. मात्र, आज त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या