18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रत्र्यंबकेश्वरचे आनंद आखाड्याचे प्रमुख सागरानंद सरस्वतींचे निधन

त्र्यंबकेश्वरचे आनंद आखाड्याचे प्रमुख सागरानंद सरस्वतींचे निधन

एकमत ऑनलाईन

नाशिक : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आनंद आखाड्याचे प्रमुख स्वामी सागरानंद सरस्वती यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. बस दुर्घटनेसंदर्भात नाशिकला आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्र्यंबकेश्वरला भेट देत स्वामी सागरानंद सरस्वती यांचे अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली.

गेल्या काही महिन्यांपासून स्वामी सागरानंद सरस्वती आजारी होते. त्यांच्यावर नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तर काही दिवसांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या आजारपणाच्या काळात आश्रमातील साधुमहंतांनी त्यांची मोठ्या प्रमाणावर सेवा केली. तसेच गेल्या सहा दशकांपासून त्र्यंबकनगरीच्या अध्यात्मिक क्षेत्रातील महान तपस्वी साधू म्हणून त्यांची ओळख होती. आज पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. त्यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्र्यंबकेश्वर येथील गणपतबारी परिसरात असणा-या सागरानंद आश्रमात जाऊन सागरानंद सरस्वतींचे अन्त्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या