21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रतलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू ; जालन्यातील हृदयद्रावक घटना

तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू ; जालन्यातील हृदयद्रावक घटना

एकमत ऑनलाईन

जालना : जालन्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जालन्यातील पाच मित्र शहरापासून जवळच असलेल्या बेथलम येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पोहत असताना दोघा जणांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते तलावात बुडाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

शहरातील बैदपुरा, कबाडी मोहल्ला आणि खडकपुरा येथील पाच तरुण हे बेथलम परिसरात फिरण्यासाठी गेले होते. शुक्रवारी सायंकाळी फिरत फिरत ते एका तलावाजवळ पोहोचले. यानंतर त्या ठिकाणी हे पाचही जण पोहण्यासाठी तळ्यात उतरले. मात्र, काहीवेळानंतर या पाच जणांपैकी केवळ तिघेच बाहेर आले.

खडकपुरा येथील जुनेद फिरौज बागवान आणि बैदपुरा येथील नदीम खान बाबू खान हे दोघे जण बराच वेळ झाला तरी बाहेर आले नाहीत. त्यामुळे इतर तिघांना संशय आला. यानंतर घाबरलेल्या तरुणांनी आरडाओरड केली. यानंतर घटनास्थळी ग्रामस्थ जमा झाले. ग्रामस्थांनी पोलिस आणि अग्निशामक दलास कळवून शोधकार्य सुरू केले. मात्र, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या