पुणे: औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयाला विरोध करणा-या समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणा-या आरोपींना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एक जण नाशिक तर दोघांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.
अबु आझमी यांच्या खाजगी सचिवांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला अबू आझमी यांनी सभागृहात विरोध केला होता.
त्यामुळे त्यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पुण्यातून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. तर एक आरोपी नाशिकचा असल्याची माहिती समोर आली आहे .