24.7 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home महाराष्ट्र भिवंडीतील मृतांचा आकडा २५ वर

भिवंडीतील मृतांचा आकडा २५ वर

एकमत ऑनलाईन

ठाणे : भिवंडीत तीन मजली इमारतीचा एक भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांचा आकडा २५ झाला आहे. अद्यापही इमारतीच्या ढिगा-याखाली काही रहिवासीअडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ३६ तास उलटून गेल्यानंतरही बचाव कार्य अद्याप सुरू आहे. आतापर्यंत २५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.

इमारतीचा तिस-या मजल्याचा स्लॅब अधांतरी असल्याने बचावकार्यात अडथळा येत होता. एनडीआरएफ, टीडीआरएफ तसेच भिवंडी आणि ठाणे अग्निशमन दलाचे जवान ढिगा-याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, मृतांच्या कुटुंबाला ४ लाख आणि जखमींना ५० हजार देण्यात येतील, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

ही कोणती सामाजिक सुरक्षा?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या