25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रउपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय आश्चर्याचा धक्का : फडणवीस

उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय आश्चर्याचा धक्का : फडणवीस

एकमत ऑनलाईन

मुंबई : मी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करत होतो. त्यावेळी माझ्यासोबत बसलेल्या तिघांना कोणाला मुख्यमंत्री बनवले जाणार हे माहीत होते. मी मुख्यमंत्री होणार नाही, याची मला आधीच माहिती देण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यानंतर मला उपमुख्यमंत्री करण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता, अशी कबुली नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राजकारण अशा घटना घडतात. मी उद्धव ठाकरे यांना सरप्राईज करायला गेलो. मी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करत होतो. त्यावेळी माझ्यासोबत बसलेल्या तिघांना कोणाला मुख्यमंत्री बनवले जाणार, हे माहीत होते. मी मुख्यमंत्री होणार नाही हे मला आधीच माहीत होते. मला उपमुख्यमंत्री करण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासाठी आश्चर्यकारक होता. मात्र, यासोबतच आमच्या कोअर कमिटीतील चार-पाच लोकांशिवाय कोणालाच काय होणार आहे, हे माहीत नव्हते, असे फडणवीस म्हणाले.

आमचे सरकार आता कोणत्याही परिस्थितीत पडणार नाही. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे. त्याचा मंत्रिमंडळ विस्तारावर काहीही परिणाम होणार नाही. राजकीय कारणांमुळे आपण मंत्रिमंडळाचा विस्तार थोडा मागे-पुढे करू शकतो, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

व्हीप लागू होत नाही
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने व्हिप लागू होत नाही, त्याच प्रकारे विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हीप लागू होत नाही. यासंदर्भात न्यायालयाचे अनेक निर्णय आहेत. मात्र, याबाबत कायदेतज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत.

मंत्रिमंडळ स्थापनेबाबत ठरले नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळ कधी होणार, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आजपर्यंत कोणतीही चर्चा झाली नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात किती लोक घ्यावे लागतात, आमच्या (भाजप) पक्षाचे किती जण घ्यायचे आहेत, त्यावर अजून चर्चा झालेली नाही, असे ते म्हणाले.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या