28.7 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home महाराष्ट्र कर्नाटकव्याप्त सीमाभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा !

कर्नाटकव्याप्त सीमाभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा !

सर्वोच्च न्यायालयातील लढा निर्धाराने लढावा लागेल ! -शरद पवार

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि.२७ (प्रतिनिधी) सीमाभाग हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. तेथील मराठी बांधवांसोबत कर्नाटक सरकार सुडाने वागत आहे. प्रकरण कोर्टात असतानाही बेळगावला उपराजधानी करून शहराचे नामांतर केले गेले. हा कोर्टाचा अपमान आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. तर सर्वोच्च न्यायालयातील लढाई हे सीमावादातील शेवटचे शस्त्र असून आता आपण अंतिम पर्वाच्या दिशेने आहोत. तेथे राज्याची भूमिका ठामपणे मांडावी लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद; संघर्ष‍ आणि संकल्प’ या पुस्तकाचे प्रकाशन आज करण्यात आले. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सीमा भागाचे समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार अरविंद सावंत, सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्तेउपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, संपूर्ण महाराष्ट्र सीमावासींच्या पाठिशी असून कर्नाटक व्याप्त भाग महाराष्ट्रात आणण्याचा निर्धार मुख्यमंत्री व्यक्त केला.सीमावासियांच्या पिढ्यान्-पिढ्या कर्नाटक सरकारच्या अत्याचाराला सामोऱ्या जात असून त्याविरुद्ध पूर्वीप्रमाणेच एकजुट करणे आवश्यक आहे. मराठी एकीकरण समितीत फूट पडली. मराठीला दुहीचा शाप आहे. आपण मराठी अस्मिता एकत्र आणत नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही. आजपासून नवीन सुरुवात करुया. मतभेद झाले तर गाडून टाका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भाषावार प्रांतरचना झाली पण महाराष्ट्रातील मराठी माणसं आपल्यापासून दूर केली गेली. बेळगावला मराठी महापौर निवडून आले, पण त्यांनी काही केलं तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. मातृभाषेसाठी लढला तर राजद्रोह कसा होतो ? अस सवाल करताना, जोपर्यंत हा भाग महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, ही प्रतिज्ञा सर्वांनी करावी,असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडावी ! – शरद पवार
शरद पवार यांनी सीमाभागातील नागरिकांच्या लढ्याचे वर्णन करुन वर्षानुवर्षे शेतकरी, विद्यार्थी, तरुण, वयस्क आदी सर्वच घटकांनी हा लढा चालू ठेवल्याबद्दल प्रशंसा केली. महाजन आयोगाची स्थापना, मधु मंगेश कर्णिक यांच्यासह सीमाप्रश्नातील न्यायालयीन प्रकरणासाठी पुरावे जमा करण्यासाठी केलेले प्रयत्न, महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना तसेच सत्याग्रह, त्यात राजकीय नेतृत्त्वाने भोगलेला तुरुंगवास आदींचा उल्लेख करुन पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयातील लढा हे सीमावादातील शेवटचे शस्त्र असून आता आपण अंतिम पर्वाच्या दिशेने आहोत. तेथे राज्याची भूमिका ठामपणे मांडावी लागेल,असे पवार म्हणाले.

सहावर्षांत केंद्राकडून इंधनदरात ३० टक्क्यांची वाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या