25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात रुग्णसंख्येत घट

राज्यात रुग्णसंख्येत घट

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून स्थिरावलेली असताना नव्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४८ हजार ६२१ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल निदान झालेल्या रुग्णांची संख्या ५६ हजार ६४७ इतकी होती, तर आज एकूण ५९ हजार ५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ५१ हजार ३५६ इतकी होती. कालच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत आज घट झाली असून हा फरक ८ हजार ०२६ इतका आहे.

याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ६५ हजार ८७० वर आली आहे. आज राज्यात एकूण ५६७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ६६९ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ५९ हजार ५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ४० लाख ४१ हजार १५८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.०७ टक्क्यांवर आले आहे.

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रात पुण्यात आहे. त्यामुळे अदर पूनावाला यांनी लस देण्याच्याबाबतीत महाराष्ट्राला काहीसे झुकते माप द्यावे, अशी विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राज्यात सध्या कोरोना संसर्ग वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत, तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाच्या तिस-या टप्प्यालाही सुरूवात झाली आहे. मात्र, लस तुटवड्यामुळे राज्य सरकारकडून हा लसीकरणाचा टप्पा राबवताना अडथळे येत असल्याचे सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आज आरोग्यमंत्री टोपेंनी सीरमचे पूनावाला यांना ही विनंती केल्याचे दिसत आहे.

कर्नाटकात २४ रुग्णांचा ऑक्सीजनअभावी मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या