27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा घट

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा घट

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ४७५७ कोरोनाग्रस्त आढळले असून ४० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. तर तब्बल ७४८६ कोरोनाग्रस्त बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट तब्बल ९३.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

महाराष्ट्रात सध्या १८,५४,६२४ कोरोनाग्रस्त असून ४७,७३४ कोरोनाग्रस्तांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. एकूण कोरोनाग्रस्तांपैकी १७,२३,३७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात ८००७९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईत गेल्या २४ तासांत ७८६ कोरोनाग्रस्त आढळले असून, एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ लाख ८६ हजार ०५३ वर पोहोचला आहे. तर एकूण मृतांचा आकडा १०,८९६ वर पोहोचला आहे.

साधेपणाने होणार बायडन शपथ सोहळा ?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या