26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात फेन्सिंगसाठी डेडिकेटिव्ह हॉल निर्माण करणार

राज्यात फेन्सिंगसाठी डेडिकेटिव्ह हॉल निर्माण करणार

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर – राज्यात फेन्सिंग (तलवारबाजी) खेळाला चालना मिळावी, या खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करण्याची संधी राज्यातील खेळाडूंना उपलब्ध व्हावी, यासाठी राज्यातील पाच जिल्ह्यांत तलवारबाजीसाठी डेडिकेटिव्ह हॉल निर्माण करण्यात येणार आहेत. या हॉलसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून व महाराष्ट्र फेन्स्ािंग असोसिएशनच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी ३२ व्या राज्यस्तर वरिष्ठ गट फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केले.

महाराष्ट्र फेन्स्ािंग असोसिएशन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर आणि कोल्हापूर फेन्स्ािंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३२ व्या राज्यस्तर वरिष्ठगट फेन्स्ािंग अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात छत्रपती शाहू महाराज व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राकेशकुमार मुदगल, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. शिंपा शर्मा, क्रीडा उपसंचालक संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रकाश काटोळे, फेन्सिंग असोसिएशनचे सचिव उदय डोंगरे, फेन्सिंग असोसिएशनचे सल्लागार अशोक दुधारे, फेन्सिंग असोसिएशनचे खजिनदार राजकुमार सोमवंशी, स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष संजय जाधव, कोल्हापूर फेन्सिंग असोसिएशनचे सचिव विनय जाधव यांच्यासह फेन्सिंग मार्गदर्शक, रेफरी व खेळाडू उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या