24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रजगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान

जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान

एकमत ऑनलाईन

पुणे : जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा ३३६ वा पालखी सोहळा आज (गुरुवार)पार पडला असून, अगदी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थित पालखीने प्रस्थान ठेवले. प्रदक्षिणा घालून पादुका मुख्य मंदिरात विसावल्या. त्यानंतर १९ जुलै रोजी एसटी बसमधून पंढरपूरला रवाना होणार असल्याचे देवस्थानाकडून सांगण्यात आले आहे.

देहू नगरी दरवर्षी ग्यानबा तुकारामाच्या गजराने दुमदुमून जाते. मात्र, गेल्यावर्षीपासून कोरोना महमारीचे संकट निर्माण झालेले असल्याने अगदी मोजक्याच प्रतिनिधींच्या उपस्थितीत यंदाचा पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. मुख्य मंदिराच्या इथून पालखीने दुपारी चार वाजेच्या सुमारास प्रस्थान ठेवले. देहू नगरीत महाराष्ट्रासह इतर ठिकाणाहून वारक-यांनी येऊ नये, असे आवाहन विश्वस्थांकडून करण्यात आले होते. त्याला वारकरी संप्रदायाने प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, संपूर्ण देहूनगरीत आज शांततामय वातावरण होते. दरम्यान, पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी मुख्य मंदिरात विसावली असून १९ जुलै रोजी एसटीमधून पंढरपूरला रवाना होणार आहे.

संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आषाढी वारीदरम्यान लाखभर भाविकांसाठी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून अन्नदान सोहळा आयोजित करणा-या देहूगावातील संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळाचा तीन दिवसीय अन्नदान सोहळा यंदा सलग दुस-या वर्षी कोरोनामुळे खंडित झाला. गेल्या वर्षी कोरोनाविषयक मदतकार्यात योगदान देणा-या मंडळाच्या वतीने यंदा अन्नदानाऐवजी पंचक्रोशीतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

एसईबीसी ठरविण्याचा अधिकार केंद्रालाच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या