पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सपत्नीक महापूजा संपन्न झाली. पहाटे अडीच वाजता पूजेला सुरुवात झाल्यानंतर साडेतीन वाजण्याच्या सुमारास विठ्ठलाच्या लाईव्ह दर्शनासह महापूजेचा हा सोहळा पार पडला. यावेळी श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेच्या मानाच्या वारकरी दाम्पत्याचा मान कवडुजी नारायण भोयर ( वय ६४) व कुसुमबाई कवडूजी भोयर ( वय ५५ रा.मु.डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता.हिंगणघाट, जि. वर्धा) यांना मिळाला. उपमुख्यमंत्र्यांसमेवत या दाम्पत्यानेही श्री विठ्ठलाची महापूजा केली.
श्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कोरोनाचे सावट असल्याने अतिशय कमी मान्यवरांच्या उपस्थितीत यंदाची कार्तिकी एकादशीची महापूजा संपन्न झाली.
कोरोनाची लस लवकर मिळू दे; उपमुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाकडे साकडे
जगावर देशावरचे कोरोनाचे संकट दूर होऊ दे. कोरोनाची लवकर लस मिळू दे असे साकडे विठ्ठलाला घातले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. कार्तिकी एकादशी निमित्त आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी पवार यांनी राज्यातील जनतेच्या वतीने श्री विठ्ठलाला साकडे घातले.
कोरोनामुळे लाॅक डाऊन पडले आहे. त्यामुळे शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर छोटे-छोटे कामगार, हातावरचे पोट असणारे लोक यांनादेखील काम करता येत नाही. यामुळे त्यांचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न गंभीर होत आहेत. ही परिस्थिती लवकर बदलू दे. कोरोनाचे संकट दूर होऊ दे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बळ मिळू दे, असे साकडे पांडुरंगाकडे घातले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी- भाजपाचे सरकार स्थापन होणार होते. पण शरद पवारांनी ऐनवेळी निर्णय बदलला !