32.6 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रउपमुख्यमंत्री अजित पवार करोनामुक्त; रुग्णालयातून घरी परतले !

उपमुख्यमंत्री अजित पवार करोनामुक्त; रुग्णालयातून घरी परतले !

पुढील काही दिवस होम क्वारंटाइन राहणार

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि. २(प्रतिनिधी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे करोनामुक्त झाले असून त्यांना सिमवरी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जनतेच्या सदिच्छा व उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेसच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो असल्याचे सांगतानाच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील आणखी काही दिवस घरीच विलगीकरणात राहणार आल्याची माहिती स्वतः अजित पवार यांनी दिली. प्रकृतीसाठी सदिच्छा देणाऱ्यांचे त्यांनी ट्विटरवरून आभारही मानले.

करोनाच्या काळात अजित पवार यांचे दौरे बैठका सुरूच होत्या. अतिवृष्टीच्या काळातही त्यांनी आपत्तीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौरा केला होता. या दरम्यानच त्यांना काहीसा थकवा जाणवत होता. त्यामुळे ते चार-पाच दिवस होम क्वारंटाइन झाले होते. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: ट्विट करुन त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली होती. खबरादारीचा उपाय म्हणून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. सात दिवसांच्या उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले असून आज उपमुख्यमंत्र्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

पुढील काही दिवस ते विलगीकरणात राहणार असून कार्यालयीन कामकाज घरुनच करणार आहेत. महत्वाच्या बैठकांना देखिल उपमुख्यमंत्री व्हीसीद्वारे उपस्थित असतील, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.

पुरातत्व संचालनालयाने ‘सर्किट ऑफ कॉन्झर्व्हेशन अँड डेव्हलपमेंट प्लॅन’ तयार करावा – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या