23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रउपमुख्यमंत्री फडणवीस यांचा रक्ततुलास नकार

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा रक्ततुलास नकार

एकमत ऑनलाईन

अमरावती : अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. या क्रार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रक्ततुला करण्यात येणार होती. त्या दृष्टीने राणा दाम्पत्याने मोठी गर्दी जमवली होती. तसेच रक्ततुलाची तयारीही करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी फडणवीस यांनी रक्ततुला करण्यास नकार दिला. त्यांनी तेथे केलेली व्यवस्था अगदी इशा-यानेच हलविण्यास सांगितली. यावरून वादाला तोंड फुटल्याने फडणवीस यांनी रक्ततुला करण्यास नकार दिला.

आजच्या या दहीहंडीच्या पार्श्वभूमीर राणा दाम्पत्यांकडून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला करण्यात येणार होती. मात्र ती रक्ततुला आता रद्द करण्यात आली आहे. तत्पूर्वी फडणवीस यांच्या वजनाएवढी रक्ततुला करण्यात येणार होती. फडणवीस यांनी विरोध केल्याने ती रद्द करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे विदर्भातील मोठी दहीहंडी म्हणून प्रसिद्ध असलेली अपक्ष आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीची दहीहंडी आज रविवारी २१ ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आला. या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला देखील करण्यात येणार होती. दरम्यान, राज्यात या रक्ततुलामुळे आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यापार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यातच ऐनवेळी ही रक्ततुला रद्द करण्यात आली.

मंत्रीपदासाठी आणखी काय करणार?
मंत्रीपद मिळवण्यासाठी रवी राणांना आणखी काय काय करावे लागेल हे येणारा काळच ठरवेल. रक्ततुलाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना खूष करण्यासाठी आणि रवी राणा यांची मंत्रीपदी वर्णी लागावी म्हणून नवनीत राणांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. असा खोचक टोमणा मिटकरांनी राणा यांना मारला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या