22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या सुमारे ४५ टक्के क्षेत्रावर वाळवंटीकरण

महाराष्ट्राच्या सुमारे ४५ टक्के क्षेत्रावर वाळवंटीकरण

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्­ट्रातील तब्­बल ४४.९३ टक्­के क्षेत्रावर वाळवंटीकरणाची प्रक्रिया सुरु आहे, अशी धक्­कादायक माहिती इंडियन स्­पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्­त्रो) आणि अहमदाबाद येथील स्­पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटरने २०१६ मध्­ये केलेल्­या अभ्­यासातून समोर आली होती. या संस्­थांनी केलेल्­या अभ्­यासावेळी २००३ ते २००५ आणि २०११ ते २०१३ या कालावधीतील महाराष्­ट्रातील भूभागाचा आढावा घेतला होता. महाराष्­ट्रातील तब्­बल १, ३८,२५,९३५ हेक्­टर एवढया मोठया भूभागाचे वाळवंटीकरण होत आहे. मागील १५ वर्षांमध्­ये यामध्­ये १.५५ टक्­क्­यांनी भर पडली असल्­याचे या अभ्­यासात स्­पष्­ट झाले होते.

राज्­यातील ४८ लाख, ८४ हजार हेक्­टर जमिनीवरील हरीत आच्­छादन नष्­ट होत आहे. पावसाचे पाणी व शेतीसाठी बेसुमार पाणी वापरामुळे ८० लाख ६० हजार ७५३ हेक्­टर जमिनीची धूप होत आहे. यामुळे महाराष्­ट्रात वाळवंटीकरणाच्­या प्रक्रिया मोठ्या भूभागावर सुरु आहेत. राज्­यात क्षारपड जमीन २९,०८९ हेक्­टर, पडजमिनी ५०,६१६३ हेक्­टर अणि रहिवासीकरण झालेली जमीन ३२,६०१३ हेक्­टर इतकी असून एवढ्या भूभागावर वाळवंटीकरणाची प्रक्रिया होत असल्­याचे निरीक्षणही या अभ्­यासात नोंदवले गेले होते. महाराष्­ट्राचा विचार करता वाळवंटीकरण रोखण्­यासाठी प्रामुख्­याने जमिनीची भूजल पातळी कशी वाढवता येईल, याचा सर्व यंत्रणांनी गांर्भीयाने विचार करण्­याची गरज आहे. पावसाचे पाणी जमिनी मुरवणे तसेच भूजल पातळी शाश्­वत राहिल यासाठी उपाययोजना करणे आवश्­यक आहे, असे ज्­येष्­ठ पर्यावरण पत्रकार अभिजित घोरपडे यांनी सांगितले.

सर्व जिल्ह्यांतील हरित पट्टा कमी होतोय
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हरित पट्टा कमी होत आहे. बेसुमार वृक्षतोड आणि वृक्षारोपनाचा अभाव यामुळे ही समस्या गंभीर होत आहे. तसेच शहरांमधील रहिवासी आणि औद्योगिक पट्ट्यांमधील बांधकाम हे पर्यावरण पोषक नाही. भूजल पातळी खूप खालावली आहे. नद्या, तलाव, सरोवर प्रदूषित झाले आहेत. बेसुमार पाणी वापर होतोय. या सर्वांमुळे वाळवंटीकरण प्रक्रिया वेगाने होत आहे. असे औरंगाबाद येथील सरस्वती भुवन कॉलेज ऑफ सायन्सच्या उपप्राचार्य डॉ. क्षमा खोब्रागडे यांनी सांगितले.

देशातील बहुतांश राज्­यांना धोका
देशातील एकूण भूभागापैकी २९.३२ टक्­के भूभागाचे वाळवंटीकरण झाले आहे. २००३-२००५मध्­ये हे क्षेत्रफळ ९४.५३ दशलक्ष हेक्­टर इतके होते. ते देशाच्­या एकुण क्षेत्रफळाच्­या २८.७६ टक्­के होते. वाळवंटीकरणात सर्वाधिक वाटा असणा-या राज्­यांमध्­ये राजस्­थान, महाराष्­ट्र, गुजरात, जम्­मू-काश्­मीर, कर्नाटक, झारखंड, ओडिशा, मध्­य प्रदेश, तेलगंणा याचा समावेश आहे. विशेष म्­हणजे राजस्­थान, झारखंड, दिल्­ली, गुजरात गोवा राज्­यांमध्­ये ५० टक्­के भूभागाचे वाळवंटीकरण होत आहे.

उपाययोजनेसाठी संयुक्त राष्ट्र सरसावले
संपूर्ण जगाच्­या वाढत्­या लोकसंख्­येचा विचार करता पुढील ९ वर्षांमध्­ये उत्­पादनास अतिरिक्­त ३०० दशलक्ष हेक्­टर जमीन लागणार आहे. शेतीसाठी अतिरिक्­त जमिनीचा वापर टाळण्­यासाठीच जमीन सुधारणे आणि पुनर्प्राप्­ती ही यंदाची संयुक्­त राष्­ट्रची थीम आहे. दुष्­काळ व वाढते वाळवंटीकरण रोखण्­यासाठी करण्­यात येणा-या उपाययोजनांमध्­ये राजकीय इच्­छाशक्­तीबरोबरच लोकसहभागही तेवढाच महत्­वाचा आहे. व्­यापक प्रबोधनातून भावी पिढीच्­या सुरक्षेसाठी सर्वांनीच उपाययोजनांमध्­ये सहभागी होणे गरजेचे आहे.

सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या