24.2 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रदेशपांडे, धुरी पोहचले शिवतीर्थवर

देशपांडे, धुरी पोहचले शिवतीर्थवर

एकमत ऑनलाईन

मुंबई : मागील काही दिवसांपासून गायब असणारे मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी शुक्रवारी अखेर मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मनसेच्या या दोन नेत्यांना गुरुवारी सत्र न्यायालयाने काही अटी-शर्थींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आज सकाळी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी ‘शिवतीर्थ’ येथे दाखल होतं राज ठाकरे यांची भेट घेत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.

मनसेच्या आंदोलनादरम्यान, शिवाजी पार्क पोलिसांनी या दोन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी गेल्या अनेक दिवसांपासून गायब होते. पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी पथकही तयार केले होते. मात्र ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते. या दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर काल या दोघांनाही अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आणि त्यांच्या डोक्यावरील अटकेची टांगती तलवार दूर झाली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या