24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रदोन वर्षे तुरूंगात काढूनही डिप्रेशनमध्ये गेलो नाही

दोन वर्षे तुरूंगात काढूनही डिप्रेशनमध्ये गेलो नाही

एकमत ऑनलाईन

नाशिक : दोन वर्षे मी जेलमध्ये राहून आलो तरी डिप्रेशनमध्ये गेलो नाही. मग तुम्हाला ऑनलाईन शिक्षणामुळे डिप्रेशन कसे येतें? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना विचारला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. तर ३.०६ टक्के विद्यार्थी या परीक्षेत नापास झाले आहेत. परंतु, नापास झाल्यानंतर विद्यार्थींनी निराश होऊ नये यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला आहे. दोन वर्षे मी जेलमध्ये राहून आलो तरी डिप्रेशनमध्ये गेलो नाही आणि तुम्हाला ऑनलाईन शिक्षणामुळे डिप्रेशन येतं का? असा प्रश्न विचारत डिप्रेशन न घेता अभ्यास करण्याचा सल्ला छगन भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरच नाशिकमध्ये उभारले जाणार आहे. आज त्याचा भूमिपूजन सोहळा ंिदडोरी तालुक्यातील शिवनई गावात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांच्या हस्ते पार पडला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या