25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रअजित पवारांना देवगिरी बंगला

अजित पवारांना देवगिरी बंगला

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन आता महिना उलटला. अद्याप नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. पण काही मंत्र्यांना बंगल्याचे वाटप सरकारकडून करण्यात आले आहे. यामध्ये अजित पवारांना देवगिरी बंगलाच पुन्हा एकदा देण्यात आला आहे.

मविआ सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना पवार दिवगिरी बंगल्यात राहत होते. मविआचे सरकार गेल्यानंतर आता अजित पवार विरोधीपक्ष नेते बनले आहेत. मात्र, त्यांचे वास्तव्याचे ठिकाण न बदलण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे. बंगल्यातील वास्तव्य इतरत्र न हालवता पुन्हा एकदा त्यांना हाच बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या