22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रचित्रपट महामंडळाच्या सभासदांचा धडक मोर्चा

चित्रपट महामंडळाच्या सभासदांचा धडक मोर्चा

एकमत ऑनलाईन

चित्रपट महामंडळाची निवडणूक घेण्याची मागणी
कोल्हापूर : मराठी चित्रपट सृष्टीतील मातृसंस्था म्हणून ओळख असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सभासदांनी शुक्रवार, दि. २६ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात उपधर्मादाय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

गेल्या दीड वर्षापासून चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रलंबित आहे. ती त्वरित लावावी व निवडणूक होईपर्यंत महामंडळावर प्रशासकाची नेमणूक करावी, अशी मागणी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ बचाव समितीच्या वतीने करण्यात आली. उपधर्मादाय आयुक्त यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयावर हा मोर्चा धडकला व चित्रपट महामंडळाच्या पदाधिका-यांनाही निवडणूक मागणीचे निवेदन देण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या