32.9 C
Latur
Thursday, March 4, 2021
Home महाराष्ट्र धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण 

धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण 

एकमत ऑनलाईन

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या काही मंत्र्यांनीही स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या मंत्र्यांनी ही तातडीची पावले उचलली आहेत.

10 जून रोजी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आले होते. वर्धापन दिन आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क आल्याने ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे.

Read More  ‘कोरोना’वर लस : अमेरिकन कंपनीसोबत करार, 50 कोटी ‘डोस’ तयार करण्याचं ‘लक्ष्य’

मुंबईत मंत्रालयाच्या समोर असलेल्या मंत्र्यांच्या बंगला परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या बंगला परिसरातील कर्मचारी वस्ती असलेल्या भागातही कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये मुंडेंच्या स्वयंपाकी, मदतनीस यांचा समावेश आहे. धनंजय मुंडे यांच्यासह सर्वांवर सध्या उपचार सुरु आहेत.

याअगोदर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने या दोन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या