मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करूणा शर्मा मुंडे यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहे. धनंजय मुंडे यांच्या दबावामुळेच माझा आईने आत्महत्या केली. मुंडे यांची पहिली बायको असून त्याचे माझाकडे पुरावे आहे. त्यांनीच माझ्या आईची हत्या केली आहे, असा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.
करुणा शर्मा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. या पत्रकार परिषदेत मुलगी शिवानी धनंजय मुंडे मोठा गौप्यस्फोट करणार होती. पण ऐनवेळी मुलगी पत्रकार परिषदेस गैरहजर राहिली.
धनंजय यांच्या सांगण्यावरून मी बहिणीला घराबाहेर काढले. मी मंत्री महोदय यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र मंत्री महोदय यांनीच माझा बहिणीच्या मोबाइलवर मेसेज केले. यानंतर मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्री धनंजय मुंडे याच्या दबावामुळे आमच्यावर गुन्हे दाखल करत अटकेची कारवाई केली. मी मुंडे यांची पहिली बायको असून त्याचे माझाकडे पुरावे आहे.
मी आजपर्यंत माझं तोंड उघडलं नाही. मी आजपर्यंत त्यांची इज्जत करत होती, मुंडे यांच्या दबावामुळेच माझा आईने आत्महत्या केली. २००८ पासून मुंडेंवर विश्वास ठेवून बहिणींशी बोलत नाही. माझा आईची मुंडेंनी हत्या केली, असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला.
मुंडेंनी मंत्रिपदाचा गैरवापर केला. शरद पवारांनी मुंडेंना मंत्रिपदावरून हकलं पाहिजे. माझापासून दोन मुलांना जन्म देऊन आम्हाला रस्त्यावर सोडलं. मी माझा बहिणीला जेल मध्ये भेटायला गेले. धनंजय मुंडे यांचे अन्य महिलांशीही अनैतिक संबध आहेत याचे पुरावे माझाकडे आहेत, असा आरोपही करुणा शर्मा यांनी केला.
छत्रपतीच्या नावाने राजकारण करणारे आज का नाही बोलत. सुप्रिया ताई यांच्याकडे न्यायासाठी अनेकदा विनंती केली मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. माझी एकच मागणी आहे त्यांच्याकडे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हकलावे. धनंजय मुंडे यांनी इतर महिलांनाही दबाव टाकून गप्प केले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर माझा बहिणीने केलेले आरोप लवकरच माझी बहिण त्याचे पुरावे देईल, असंही करुणा शर्मा म्हणाल्या.