35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home महाराष्ट्र धनंजय मुंडे समर्थक सहकुटुंब मुंबईत

धनंजय मुंडे समर्थक सहकुटुंब मुंबईत

एकमत ऑनलाईन

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाºया रेणू शर्मा यांच्यावर फसवणुकीचे आरोप झाल्यानंतर आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. धनंजय मुंडे यांचे शासकीय निवासस्थान ‘चित्रकूट’ या बंगल्यासमोर त्यांच्या समर्थकांची गर्दी वाढली आहे. १६ जानेवारी रोजी सकाळी मुंडे यांच्या घरासमोर शुकशुकाट होता. मात्र, हळूहळू मुंडे यांची भेट घेऊन त्यांचे समर्थन करणा-यांची संख्या वाढली आहे.

मुंडे समर्थकांची गर्दी का वाढली?
गायिका रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मागील काही दिवसांपूर्वी बलात्काराचे आरोप केले आहेत. रेणू शर्मा यांच्या आरोपानंतर राजकीय गोटात खळबळ उडाली होती. मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र, त्यानंतर रेणू शर्मा यांनी अनेकांना फसवल्याची चर्चा सुरू झाली. भाजप नेते कृष्णा हेगडे, मनसे नेते मनीष धुरी आणि जेट एअरवेज कंपनीत अधिकारी असलेल्या रिझवान कुरेशी या तिघांनी रेणू शर्मा यांनी जवळीक साधत फसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शुक्रवारी केला. या आरोपानंतर धनंजय मुंडे यांना जाहीरपणे समर्थन केले जाऊ लागले आहे. त्यांचा पक्ष राष्ट्रवादीनेही धनंजय मुंडे यांचे समर्थन करत पूर्ण चौकशी झाल्याशिवाय त्यांच्यावर कारवाई करणार नसल्याचे म्हटलेय. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या समर्थकांची त्यांच्या घरासमोर गर्दी वाढली असून त्यांच्या मनात आनंदाची भावना निर्माण झाली आहे.

मुंडे माझे मित्र नाहीत : कृष्णा हेगडे
मी धनंजय मुंडेंना ओळखतो. त्यांना २०१२ मध्ये एकदाच भेटलो होतो. पण ते माझे मित्र नाहीत. त्यामुळे त्यांच्या राजकीय मदतीसाठी धावून जाण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले. रेणू शर्मा यांनी हेगडे यांचा आदर करत असल्याचे सांगितलेय. त्या माझ्या आदर करतात. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण आदर दुरूनच करा. मीही त्यांचे लांबूनच आभार मानतो, असेही ते म्हणाले.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या