19.1 C
Latur
Monday, January 18, 2021
Home मराठवाडा सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाच्या निर्मितीचा विचार सुरू-धनंजय मुंडे

सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाच्या निर्मितीचा विचार सुरू-धनंजय मुंडे

एकमत ऑनलाईन

मुंबई – सफाई कामगारांचे विविध प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आयोजित एका बैठकीत मुंडे बोलत होते.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे , समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, सफाई कामगार संघटनेचे गोविंदभाई परमार, तसेच विविध सफाई कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, सफाई कामगारांच्या बाबतचा लाड-पागे समितीचा अहवाल व सद्यस्थिती यांचा समन्वय साधून योग्य निर्णय घेतला जाईल. कामगारांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील. सफाई कामगारांच्या वारसा हक्क नियुक्ती देण्यासंदर्भात प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. नियुक्तीसाठी शैक्षणिक अर्हता तपासली जाईल. सफाई कामगारांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार आहोत, असेही मुंडे म्हणाले.

अनुदानासाठी बेमुदत दूध बंद आंदोलन करणार; भूममध्ये बैलगाडी मोर्चा दरम्यान शेट्टी यांचा इशारा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या