35 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रपिक विम्याची मुदत वाढवण्यासाठी केंद्राला प्रस्ताव पाठवणार- धनंजय मुंडे

पिक विम्याची मुदत वाढवण्यासाठी केंद्राला प्रस्ताव पाठवणार- धनंजय मुंडे

एकमत ऑनलाईन

बीड : बीड जिल्ह्यातील पीक विमा योजनेसंदर्भात आज व्हिसीद्वारे बैठक झाली. या बैठकीत धनंजय मुंडे, (मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य व पालकमंत्री बीड जिल्ह) यांच्या पुढाकाराने शेतकºयांच्या हिताचे सकारात्मक निर्णय घेण्यात आले. पिक विमा संदर्भात लॉकडाऊनच्या काळात शेतकरी संकटात सापडला होता त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते.

बीड जिल्ह्यासाठी एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीची आगामी ३ वषार्साठी निवड करण्यात आली आहे. तसेच लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील बँका बंद असल्याने पिक विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत असणारी मुदत शेतकºयांना आणखीन १ महिना वाढवून मिळावी यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार आहोत.

बैठकीस कृषी मंत्री दादाजी भुसे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषी सचिव व कृषी आयुक्त उपस्थित होते. पिक विमा कंपनी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री यांचे आभार मानले.

Read More  गुळखेड्यात कोरोनाचा पॉझीटीव्ह रुग्ण आढळला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या