26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रधारावी पुनर्विकास : रेल्वेची जागा हस्तांतरीत, नव्याने निविदा निघणार

धारावी पुनर्विकास : रेल्वेची जागा हस्तांतरीत, नव्याने निविदा निघणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी नव्याने निविदा काढण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. गेल्या १८ वर्षांपासून धारावीचा पुनर्विकास रखडला आहे. त्यामुळे नव्याने काढण्यात येणा-या निविदांमध्ये डेव्हलपर्सना काही अतिरिक्त सूट देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

२८ नोव्हेंबर २०१८ रोजी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत यशस्वी झालेल्या सेकलिंक कंपनीला ७ फेब्रुवारी २०१९ रोजी यशस्वी निविदाकाराला देकार पत्र मिळणे आवश्­यक होते. मात्र, यशस्वी निविदाकाराला देकारपत्र देण्याऐवजी पुन्हा नव्याने निविदा काढण्याचा निर्णय महाधिवक्त्यांनी घेतला होता.

दरम्यान, धारावी प्रकल्पासाठी आवश्यक असलेली रेल्वेची ४५ एकर जमीन राज्य सरकारला महिनाभरात हस्तांतरित करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दोन महिन्यांपूर्वी दिले होते. या प्रकल्पासाठी धारावी अधिसूचित क्षेत्रा शेजारील रेल्वेची ९० पैकी ४५ एकर जमीन राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाकडून खरेदीने अधिग्रहित केली आहे.

या जमिनीची रक्कमही सरकारने रेल्वेला जमा केली आहे. त्यानंतरही केंद्र सरकारने राज्याकडे जमीन हस्तांतरित केली नव्हती. यामुळे निविदा काढण्यात अडचण निर्माण झाली. याप्रश्नी खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन ४५ एकर जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. यावर रेल्वेमंत्र्यांनी एका महिन्यात राज्य सरकारला संबंधित जमीन हस्तांतरित केली जाईल, अशी ग्वाही दिली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या