25.6 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रखैरेंनी सभेसाठी पैसे वाटले? - नितेश राणे

खैरेंनी सभेसाठी पैसे वाटले? – नितेश राणे

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील बहुचर्चित सभेत विविध मुद्यांवर भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना संभाजीनगर शाखेच्या ३७ व्या वर्धापनदिनी ठाकरे यांनी सभेचे आयोजन केले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी मुस्लिमांचा द्वेष करायचे कधी सांगितले नाही. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवायचा असे शिवसेना प्रमुखांनी सांगितले आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

सभेनंतर मनसे आणि भाजप नेत्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. मात्र, या सभेसाठी कार्यकर्त्यांना पैसे वाटल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मनसेचे संदीप देशपांडे आणि कोकणातील आमदार नितेश राणे यांनी फोटो शेअर केला आहे. यामध्ये शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे पैसे देत असल्याचे दिसतेय. यानंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

माझं वय बघून राणेंनी बोलावं
हे आरोप झाल्यानंतर खैरे यांनी सर्व गोष्टी फेटाळल्या आहेत. नितेश राणे यांना मी वडिलधारा आहे. त्यांनी किमान वय पाहून आरोप करावेत, असे खैरेंनी म्हटले आहे. तसेच हा फोटो जुना आहे, असे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या