25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeमहाराष्ट्रदीदी झाशीच्या राणीसारख्या लढल्या - छगन भुजबळ

दीदी झाशीच्या राणीसारख्या लढल्या – छगन भुजबळ

एकमत ऑनलाईन

नाशिक : पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विजयावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे. ‘मेरा बंगाल नही दूंगी’ म्हणत ममता बॅनर्जी झाशीच्या राणीसारख्या लढल्या, असे सांगतानाच बंगालच्या निकालानंतर देशात भाजपविरोधी लाट निर्माण झाली आहे, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे तोंडभरून कौतुक केले. ममता बॅनर्जी या झाशीच्या राणीप्रमाणे लढल्या. ‘मै अपनी झाशी नही दूंगी’ असे झाशीच्या राणी म्हणाल्या होत्या. त्याचप्रमाणे ममता दीदीही ‘मै अपना बंगाल नही दूंगी’ म्हणत लढल्या. तशी प्रतिज्ञाच त्यांनी केली होती. बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिवसाआड सभा घेत होते. त्यांचे ८ ते १० मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. पण उपयोग झाला नाही, असा चिमटा भुजबळ यांनी काढला.

त्यावरून देशाचा कल बांधता येत नाही
आसाम वगळता भाजपला कुठेच यश मिळाले नाही. भाजपविरोधात देशात प्रचंड लाट तयार झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीवरही भाष्य केले. पंढरपूरचा निकाल गट-तट आणि इतर स्थानिक राजकारणामुळे लागत आहे. त्यावरून देशाचा कल बांधता येत नाही, असेही ते म्हणाले.

इतर राज्यांचेही निकाल दाखवा : चंद्रकांत पाटील
पश्चिम बंगालमध्ये भाजपाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. बंगालमध्ये एकेकाळी निर्विवाद सत्ता राखणारे डावे आणि जास्त जागा जिंकणाºया काँग्रेसचे संख्याबळ मर्यादित राहिलेले दिसते. बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्यांनी तृणमूल काँग्रेससोबच अघोषित आघाडी केल्याचे दिसून आले. काँग्रेस आणि डाव्यांनी आपली मते तृणमूलच्या पारड्यात टाकले. त्याचसोबत पश्चिम बंगालमध्ये ३ वरून १०० च्या जवळ पोहोचलो. भाजपा देशातला प्रभावी पक्ष आहे.

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचाच विजय झाला आहे. या विजयाविषयी बोलताना समाधान आवताडे यांचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखा आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले.

संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव : राज ठाकरे
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये मिळालेल्या लक्षणीय यशासाठी ममता बॅनर्जींचे अत्यंत मनापासून अभिनंदन. संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि या निवडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवले. कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खूप मोठी परंपरा, या बाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल याच्यात खूप समानता आहे असे ते म्हणाले.

परभणी ग्रामीण भागात एप्रिल अखेर ३२० कोरोना बाधितांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या