23.3 C
Latur
Saturday, August 8, 2020
Home महाराष्ट्र अबब ... तब्बल १.५३ लाख रुपयांना घेतली बकरी

अबब … तब्बल १.५३ लाख रुपयांना घेतली बकरी

छत्तीसगढ : सध्या छत्तीसगढमधील दुर्ग जिल्ह्यातील एक बकरी चर्चो विषय बनली आहे. या बकरीचे वैशिष्ट ऐकून कोणीही आश्चर्यचकीत होईल. ही बकरी माणसांच्या उंची एवढी असून ती ८ फूटांची आहे आणि तिचे वजन १६० किलो आहे. बकरी ईद निमित्ताने विक्रीसाठी पंजाबहून भिलाई येथे ही बकरी पोहोचली आहे. सध्या तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.

यावेळी लॉकडाऊन दरम्यान बकरी ईद प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार साजरी करण्यात येणार आहे. बकरी ईदसाठी शहरांमध्ये एकापेक्षा एक बकरी बळी देण्यासाठी आणल्या आहेत. वेगवेगळ्या जातीच्या या बकऱ्याची किंमतही आश्चर्यचकीत करणाऱ्या असतात. सध्या खरेदीदार बाहेर न जात घरात बसून ऑनलाईन बकरी खरेदी करत आहेत.

यादरम्यान शहरात या बकरीची जोरदार चर्चा सुरू आहे. ही बकरी इतर बकरी पेक्षा फार वेगळी आहे. तोतापारी आणि जमनापारी क्रॉस जातीची ही बकरी दिसायला जशी भारी आहे तसेच तिचे वैशिष्टे आहेत. छत्तीसगढमधील दुर्ग जिल्ह्यातील भिलाई फरीद नगर निवासी आई अहमद उर्फ लाल बहादुर या बकरीचा मालक आहे. त्याने ही बकरी १.५३ लाख रुपयांना घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आठवड्यापूर्वी लाल बहादूरने ही बकरी पंजाबमधून आणली होती. लाल बहादुर फरीद नगरचा रहिवासी आहे. लाल बहादुर बकरी बाबत म्हणाला की, या बकरीला पंजाबमधून खरेदी केले असून १.५३ लाखांची ही बकरी आणण्यासाठी २३ हजार रुपये खर्च आला आहे. बकरीचे वजन १४८ किलो आहे. बकरीची लांबी ८ फूट आहे आणि ती आपली मान १० फूट उंचीपर्यंत घेऊन जाऊ शकते. या बकरीचे डाएट विषयी तो पुढे म्हणाला की, बकरीच्या डाएटबाबत काही खास नाही पण तिला फळे खूप आवडतात. तसेच ताज्या भाज्या ती जास्त खाते. या बकरीला बकरी ईद निमित्ताने आणले आहे.

Read More  ‘राजगृह’ नासधूस प्रकरणातील आरोपी कोरोना पाँझिटिव्ह

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,136FansLike
92FollowersFollow