23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeमहाराष्ट्रविधानपरिषदेच्या १२ जागांच्या नियुक्तीचा वाद पंतप्रधानांच्या दरबारात

विधानपरिषदेच्या १२ जागांच्या नियुक्तीचा वाद पंतप्रधानांच्या दरबारात

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.८(प्रतिनिधी) विधानपरिषदेच्या १२ जागांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोणताही निर्णय घेत नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आज हा विषय उपस्‍थित करून लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी विनंती पंतप्रधानांना करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना याची माहिती दिली.

राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्त केल्या जाणाऱ्या १२ जागांचा मुद्दा गेल्‍या आठ महिन्यांपासून प्रलंबित आहे. राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करून व दोन वेळा स्मरणपत्र पाठवूनही राज्यपालांनी अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी विचारलेल्या माहितीला उत्तर देताना असा कोणताही प्रस्ताव राज्यपाल सचिवालयाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत हा अन्य विषयांबरोबरच हा मुद्दा देखील उपस्‍थित करण्यात आला.

महाविकास आघाडी सरकार हे बहुमताने आलेले सरकार आहे.राज्‍यमंत्रीमंडळाने याबाबतचा ठराव रितसर मंजूर करून राज्‍यपालांकडे पाठविण्यात आला आहे.या १२ व्यक्‍ती निवडताना जे निकष आहेत त्‍यांची पूर्तता करण्यात आली आहे.त्‍यामुळे याबाबतचा निर्णय राज्‍यपालांनी घ्‍यावा अशी अपेक्षा असल्‍याचे अजित पवार म्‍हणाले.

नैसर्गिक आपत्‍तींसाठी ५ हजार कोटींची मदत करावी
गेल्‍या काही वर्षात कोकण किनारपटटीवर सातत्‍याने चक्रीवादळे येत आहेत.त्‍याने मोठे नुकसानही झाले आहे.एनडीआरएफचे निकष हे २०१५ साली तयार करण्यात आले आहेत.मदत करण्यासाठी ते अपुरे ठरत आहेत.राज्‍य सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा साडेतीनपट मदत जास्‍त दिली आहे.त्‍यामुळे हे निकष बदलण्यात यावेत.तसेच सागरी किनारपट्टी भागात भूमिगत विद्युत वाहिन्या टाकणे, स्थलांतरित नागरिकांसाठी निवारे उभारणे, किनारा संरक्षक भिंती बांधणे या पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे आहे. केंद्राने याकरिता ५००० कोटी रूपयांचा निधी दयावा अशी विनंती पंतप्रधानांना करण्यात आल्‍याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बालकल्याण अधिका-यांनी रोखले ७९ बालविवाह

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या