22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यात भाजपने लावलेल्या बॅनरमुळे वाद

पुण्यात भाजपने लावलेल्या बॅनरमुळे वाद

एकमत ऑनलाईन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १४ जून रोजी प्रथमच देहू नगरीत येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर देहू संस्थान प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. भाजपनेदेखील पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठीची जय्यत तयारी केली आहे. मात्र, भाजपकडून मोदींच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरून आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे.

मोदींच्या स्वागतासाठी भाजपकडून लावण्यात आलेल्या पोस्टरवर विठ्ठलाच्या फोटोपेक्षा मोदींचा फोटो मोठा लावण्यात आला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून भाजपकडून लावण्यात आलेला हा फोटो विठ्ठलभक्तांचा आणि वारकरी संप्रदायाचा अवमान असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी ट्विट करत या बॅनरवर आक्षेप घेतला आहे.

रविकांत वरपे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचून संत तुकाराम महाराजांनी यावर कळस चढविला. पिंपरी-चिंचवड येथे भाजपाने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा मोठा दाखवून संप्रदायाचा अवमान केला आहे.

भाजपने लावलेले हे पोस्टर काढून टाकावे आणि विटेवरी उभा विठ्ठलापेक्षा मोठा कोणी नाही. वारकरी संप्रदायाची बदनामी वारकरी संप्रदाय खपवून घेणार नाही. भाजपाने वारकरी संप्रदायाची माफी मागावी अशी मागणी देखील वारकरी संप्रदायाने केली आहे…

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या