23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeमहाराष्ट्रहनुमान जन्मस्थळावरून वाद

हनुमान जन्मस्थळावरून वाद

एकमत ऑनलाईन

नाशिक : हनुमान जन्मस्थानावरून सध्या वाद सुरू असून साधू आणि महंतांमध्ये मतमतांतरे सुरू आहेत. त्यामुळे किष्किंधा मठाधिपतींनी त्र्यंबकेश्वरमध्ये ठाण मांडून आंदोलन सुरू केले आहे. हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी नसून किष्किंधा असल्याचा दावा किष्किंधाच्या मठाधिपतींनी केला आहे. तर नाशिकमधील महंतांनी जन्मस्थळावरून मतमतांतरे निर्माण केली आहेत.

राज्यामध्ये हनुमान चालिसावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना हनुमानाच्या जन्मस्थळावरून वाद निर्माण झाला आहे. किष्किंधा मठाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती हे त्र्यंबकेश्वरमध्ये आले आहेत. त्र्यंबकेश्वरमधील साधूंनी त्यांच्या भेटीला यावे ही त्यांची इच्छा होती पण त्र्यंबकेश्वरमधील कोणीही साधू-महंत त्यांची भेट घेण्यासाठी गेलेले नाही. त्यामुळे त्यांनी ठाण मांडून आंदोलन सुरू केले आहे.

रामजन्मभूमीचा वाद नुकताच संपला असताना पुन्हा हा वाद निर्माण झाला. त्यानंतर काशी-मथुरा मंदिराबाबतही सध्या वाद सुरू आहेत. दरम्यान केंद्राकडून हनुमानाचे मंदिर उभारण्यासाठी निधी दिला जात आहे. जगातील सर्वांत उंच हनुमानाची मूर्ती उभी करणार असल्याचे किष्किंधाच्या महंतांनी सांगितले आहे. त्याचबरोबर हनुमानाचा जन्म किष्किंधामध्ये झाला आहे त्यामुळे अंजनेरीच्या महंतांनी जन्मावरून दावा करू नये असे किष्किंधाच्या महंतांनी आणि मठाधिपतींनी सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या