20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeमहाराष्ट्ररेशनकार्ड धारकांना दिवाळी पॅकेज जाहीर

रेशनकार्ड धारकांना दिवाळी पॅकेज जाहीर

एकमत ऑनलाईन

मुंबई : दिवाळी सणात गोरगरिबांसाठी दिलासा देण्यासाठी शिंदे सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून अवघ्या १०० रुपयांत एक किलो रवा, चनाडाळ, साखर आणि तेल दिवाळीच्या सणासाठी मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात दिवाळीचा सण मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. या सणाला घरोघरी गोडधोड आणि फराळ करण्याची पद्धत आहे. हा सण गोरगरीबांनाही साजरा करता यावा यासाठी सरकारने हा पॅकेजचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील ७ कोटी कुटुंबांना याचा फायदा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज आमच्या कॅबिनेटने खूपच महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दिवाळीनिमित्त १ लाख ६२ हजार रेशनकार्ड धारकांना म्हणजेच ७ कोटी लोकांना साखर, रवा, चनाडाळ आणि तेल याचा एक पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हा महत्वाचा निर्णय घेतल्यानंतर आता त्याच्या वाटपाची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या