30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeमहाराष्ट्रसंपूर्ण लॉकडाऊन करा; भुजबळांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

संपूर्ण लॉकडाऊन करा; भुजबळांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

एकमत ऑनलाईन

नाशिक : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. नाशिकमध्ये तर ही परिस्थिती जास्तच चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मोठे वक्तव्य केले आहे. संपूर्ण लॉकडाऊन करण्यासाठी मी आग्रही असून तशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनासुद्धा या संबंधी भेटणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटलेय. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी नाशिकमधील आरोग्य व्यवस्थेबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सध्या नाशिकमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असल्याचे सांगितले आहे. सध्या ऑक्सिजनची १३९ मेट्रिक टन एवढी मागणी आहे. मात्र हातात फक्त ८७ टन ऑक्सिजन उपलब्ध आहे.

लक्षणे असतील तरच रुग्णालयात दाखल व्हा
यावेळी बोलताना त्यांनी कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यास हयगय करू नये असे आवाहन केले आहे. गरज नसताना मोकाट फिरणारे सुपर स्प्रेडर ठरतायत. कोरोनासदृश कोणतीही लक्षणं असली तर ताबडतोब रुग्णालयात दाखल व्हा, असे भुजबळ म्हणाले.

रेमडेसिवीर लाईफ सेव्हिंग ड्रग नाही
सध्या राज्यासह नाशिक जिल्ह्यातसुद्धा रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतो आहे. या मुद्याला हात घालत त्यांनी रेमडेसिवीर हे लाईफ सेव्हिंग ड्रग नसल्याचे सांगितले. प्रत्येक कोरोना रुग्णाला रेमडेसिवीरची गरज नाही. रेमडेसिवीर हे लाईफ सेव्हिंग ड्रग नाही. असे भुजबळ म्हणाले.

बंगळुरूचा कोलकातावर दमदार विजय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या