26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeमहाराष्ट्रगोळ्या वाटल्या की साबुदाणे? पाटलांनी दोन रुपयांत कोणत्या गोळ्या वाटल्या : तांबे

गोळ्या वाटल्या की साबुदाणे? पाटलांनी दोन रुपयांत कोणत्या गोळ्या वाटल्या : तांबे

एकमत ऑनलाईन

पुणे – ज्या आर्सेनिकच्या गोळ्यांची बाटली दोन रुपयांना मिळते ती राज्यसरकारने 23 रुपयांना एक, खरेदी केल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडमधील आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला खरा; परंतु याच गोळ्यांची बाटली पालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांनी 20 रुपयांना खरेदी केलेली आहे. एवढेच नव्हे तर नगरसेवकांच्या आग्रहाखातर महापालिकेने या गोळ्यांच्या बाटल्या खरेदीची निविदा काढली असून त्यातही सर्वात कमी दर सात रुपये 90 पैसे इतका आल्याने पाटील यांनी प्रभागात वाटलेल्या दोन रुपयांच्या गोळ्या नक्की आर्सेनिकच्या होत्या की, साबुदाणा होता अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली असून विरोधकही याचा खरपूस समाचार घेत आहेत.

राज्य सरकारने मात्र 23 रुपयांना एक, अशा खरेदी केल्याचा आरोप

करोनाच्या संसर्गामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी मतदार संघामध्ये होमिओपॅथी आर्सेनिक गोळ्यांचे वाटप केले. आमदार पाटील यांनीही कोथरूड विधानसभा मतदार संघात अशा गोळ्या वाटल्या. त्या गोळ्या त्यांनी दोन रुपयाला एक बाटली याप्रमाणे खरेदी केल्या होत्या, असा दावा करीत याच गोळ्या राज्य सरकारने मात्र 23 रुपयांना एक, अशा खरेदी केल्याचा आरोप पाटील यांनी बुधवारी ऑनलाइन प्रेस कॉन्फरन्समध्ये केला होता. तसेच, ही साथ रोखण्यात राज्यसरकार पूर्णपणे अपयशी झाले आहे. वैद्यकीय साहित्याची खरेदी करताना मर्जीतील व्यक्तींवर कृपादृष्टी केली जात असल्याची टीका केली होती.

सर्वात कमी दर हा 7 रुपये 90 पैसे

मात्र, या दोन रुपयांच्या किमतीचा दावा महापालिकेतील सत्ताधारी भाजपनेच खोटा ठरवला असून मे महिन्यात महापालिकेने याची जी खरेदी केली होती ती प्रती बाटली 20 रुपये होती. नगरसेवकांनी आणखी मागणी केल्यानंतर त्याची आणखी एक निविदा काढली. ती आज (दि. 2 जुलै) रोजी उघडली. त्यातही सर्वात कमी दर हा 7 रुपये 90 पैसे आला. यामुळे पाटील यांच्या दाव्यातील हवा पुरती निघून गेल्याचे उघड झाले आहे.

राजकारण बाजूला ठेवून सत्ताधाऱ्यांना आम्ही साथ दिली  

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांनी दोन रुपयांत नेमक्‍या कोणत्या गोळ्या कोथरूडकरांना वाटल्या, असा प्रश्‍न राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी विचारला आहे. महापालिकेमध्ये राजकारण बाजूला ठेवून सत्ताधाऱ्यांना आम्ही साथ दिली आहे. आता, यांनीच करोनाकाळात केलेल्या खरेदीची माहिती पुणेकरांसमोर ठेवावी, अशी मागणी तांबे यांनी केली आहे.

Read More  जालन्यात आणखी नव्या 28 रुग्णांची भर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या