25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeमहाराष्ट्रउद्या ससूनमधील डॉक्टरचा संप?

उद्या ससूनमधील डॉक्टरचा संप?

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्यातील कोरोना रुग्ण वाढत असताना प्रशासन यंत्रणा ससून रुग्णालयातील बेड्स वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यासोबत मनुष्यबळ, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, वैद्यकीय उपचार यंत्रणा, कर्मचारी वर्ग न देता फक्त जनतेला दाखविण्यासाठी हा निर्णय घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने आमच्या मागण्यांचा विचार करत उद्या म्हणजेच शनिवार दि़ १७ एप्रिल सकाळी ९ पर्यंत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर शनिवारपासून काम बंद करत संपावर जाण्याचा इशारा ससूनमधील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने दिला आहे.

पुण्यात कोरोनाबाधितांना उपचारासाठी बेड्स उपलब्ध होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खासगी रुग्णालयांसह सरकारी रुग्णालयातील बेड्स वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्याच धर्तीवर ससूनमधील बेड्स वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र त्याला आता मार्डतर्फे विरोध करण्यात येत आहे. मात्र, काम बंदचा इशारा देतानाच कोरोना वॉर्डसह तातडीच्या कोणत्याही सेवेवर परिणाम होऊ दिला जाणार नाही, असे मार्डतर्फे सांगण्यात आले आहे.
मार्डचे काही निवासी व प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणाले, कोरोनाची शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. बेड्स उपलब्ध करून देणे गरजेचे देखील आहे. ही परिस्थिती आम्हाला समजत आहे. मात्र, प्रशासनाने बेड्स वाढविण्यासोबतच पुरेसे मनुष्यबळ, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, वैद्यकीय कर्मचारी वर्ग सह इतर आवश्यक सुविधांचा पुरवठा आधी करावा. त्यानंतर बेड्सची संख्या वाढवावी. प्रशासन या संबंधी गंभीर नसून फक्त जनतेला दाखविण्यासाठी हा निर्णय घेत आहे.

दुस-या लाटेची कल्पना डिसेंबरमध्येच
दुस-या लाटेची कल्पना जर डिसेंबर २०२० लाच आली असताना शासनाकडून कोणतीही पूर्वतयारी केली गेली नाही असा सवाल उपस्थित करत विद्यार्थी म्हणाले, मनुष्यबळाशिवाय बेड वाढवल्यामुळे पेशंटची उपचार व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे कोलमडून जाईल. दरम्यान, आम्ही दीड महिन्यापासून प्रशासनाला यावर आवश्यक उपाययोजनांसाठी विनंती करत असून, त्यावर पावले आतापर्यंत प्रशासनाकडून उचलली गेलेली नाही.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पांना कोरोना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या