29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमहाराष्ट्रशहराचे नाव बदलून सामान्यांच्या आयुष्यात काही बदल होतो का ?

शहराचे नाव बदलून सामान्यांच्या आयुष्यात काही बदल होतो का ?

एकमत ऑनलाईन

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज हे आमचेही दैवत आहेत. परंतु औरंगाबादचे नाव बदलण्यास आमचा विरोध आहे व राहील. आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावर चांगले काम करते आहे. उगाच वातावरण खराब करण्याची गरज नाही,असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केले. काही राज्यांमध्ये शहरांची नावे बदलली; मात्र सर्वसामान्य माणसांच्या जीवनात काही फरक झाला का?असा सवाल त्यांनी केला. जनहिताच्या कामांनाच आमचे प्राधान्य असेल असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळ निर्णयाबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्ध पत्रकात काल औरंगाबाद बरोबरच संभाजीनगर असा उल्लेख केला होता. थोरात यांनी याबद्दल नापसंती व्यक्त केली होती. आज त्यांनी पत्रकारांशी बोलताना औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोध असल्याचा पुनरुच्चार केला. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही किमान समान कार्यक्रमावर एकत्र आलो आहोत. त्यानुसार काम करत राहू,असे थोरात यांनी सांगितले. तसेच सरकारी कागदपत्रांमध्येही असा उल्लेख येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीने सरकार किती उत्तम काम करू शकते याचा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे शहराचे नाव बदलून वातावरण प्रदूषित करण्याचे काही कारण नाही, अशी आमची भुमिका आहे,असेही थोरात यांनी सांगितले.

विमानतळाला मात्र संभाजी महाराजांचे नाव !
छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने औरंगाबाद विमानतळाचा ठराव आम्ही संमत केला असून तो केंद्राकडे पाठवला आहे. तो अद्याप मान्य झालेला नाही. त्याला मान्यता देण्याची जबाबदारी आता केंद्र सरकारची आणि भाजपची असल्याचे थोरात यांनी सांगितले.

ऑनलाइन फसवणुकीला बँकच जबाबदार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या