22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रगद्दारांना उत्तर देत नसतो; हे सरकार कोसळणारच

गद्दारांना उत्तर देत नसतो; हे सरकार कोसळणारच

एकमत ऑनलाईन

नाशिक : शिवसैनिकांनी प्रश्न विचारले असते तर मी उत्तर द्यायला कटीबद्ध आहे. पण गद्दांराना मी उत्तर देणार नाही. गद्दारांनी गद्दारी का केली, याचे उत्तर अगोदर द्यावे, असा घणाघात युवा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौ-यात केला. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच, असा दावा आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज नाशिकमधील मनमाड दौ-यावर असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे आक्रमक झालेत. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला.त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सुहास कांदे यांचा चांगलाच समाचार घेतला. सुहास कांदे यांच्या मतदार संघातील मांमदमध्ये शिवसंवाद मेळावा घेऊन शिवसैनिकांचा उत्साह त्यांनी यावेळी वाढवला.

मनमाडच्या विकासात आदित्य ठाकरे यांचे एक टक्कादेखील योगदान नाही. नांदगाव मतदारसंघात येऊन तुमच्या पर्यटन खात्याचा एक प्रकल्प दाखवा, असे आव्हान कांदे यांनी आदित्य ठाकरे दिले होते. कांदे यांच्या याच आव्हानाला आदित्य यांनी उत्तर दिले आहे. शिवसैनिकांच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला मी कटीबद्ध आहे. गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते, असे आदित्य ठाकरे यांनी कांदे यांच्यावर त्याचे नाव न घेता टीका केली.

आम्ही जी वचने होती ती पूर्ण केलेली आहेत आणि अजूनही करत आहोत. पाठीत खंजीर का खुपसला हे राजकारण मला अजूनही समजलेले नाही. याआधी मी मनमाडमध्ये आलो होतो. आपले सरकार आले तर पाणीपुरवठा योजनेचा पाठपुरावा करेन, असे मी आश्वासन दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना या योजनेसाठी ३०० कोटी रुपये मंजूर करुन दिले. पण स्वत:साठी काहीही आरोप केले जात आहेत, असे आदित्य म्हणाले.

पर्यटन खात्याला कधीही निधी मिळत नव्हता. मात्र आमच्या सरकारने पर्यटन खात्याला १७०० कोटी रुपये दिले. मनमाडमध्ये मी आठ कोटी रुपयांचा फंड दिला आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या