27.7 C
Latur
Wednesday, September 23, 2020
Home महाराष्ट्र वीज बिलांच्या मुद्यावर मनसे गप्प राहील अशी समजूत करुन घेऊ नये -राज...

वीज बिलांच्या मुद्यावर मनसे गप्प राहील अशी समजूत करुन घेऊ नये -राज ठाकरे

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात वीज बिलाच्या मुद्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. वीज प्रश्नावर राज्य सरकारचं दुर्लक्ष असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. भरमसाठ वीज बिलं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यांवर प्रहारच आहे, असंही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे. वीज बिलांच्या मुद्यावर मनसे गप्प राहील अशी चुकीची समजूत सरकारने करुन घेऊ नये, असा राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच इशारा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या विषयात लक्ष घालून वीजबिलात सूट द्यावी, नाही तर आम्हाला खासगी कंपन्यांना झटका द्यावा लागेल, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या लढाईत बहुदा राज्य सरकारचं एका महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष तरी होतंय किंवा ह्या विषयातील जनतेच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोहचत नसाव्यात आणि म्हणूनच ह्या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरकारचं लक्ष वेधून घेऊ इच्छिते. खासगी वीज कंपन्या असोत, महावितरण असो की बेस्ट असो सगळ्यांनी एकत्रितपणे राज्यातील वीजग्राहकांना वीजबिलांचा जबरदस्त शॉक दिला आहे. जून महिन्याची जी बिलं ग्राहकांना पाठवली गेली आहेत ती शब्दशः सामान्य माणसाचे डोळे पांढरे करणारी आहेत. जून महिन्याची जी बिलं ग्राहकांना पाठवली गेली आहेत ती शब्दशः सामान्य माणसाचे डोळे पांढरे करणारी आहेत. मार्च, एप्रिल, मे ह्या तीन महिन्यांची सरासरी वीज बिलं पाठवल्यानंतर त्या तीन महिन्यांत विजेचा झालेला वापर आणि सरासरी विजेची बिलं ह्यांच्यातील तफावत जून-जुलै महिन्यात ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सरासरी वीज बिलांच्या नावाखाली अव्वाच्यासवा बिलं आकारली गेली आहेत

तफावतीच्या नावाखाली बिलांच्या ज्या रकमा आकारल्या गेल्या आहेत त्यावरून त्याला तफावत न म्हणता लूटच म्हणावं लागेल. त्यात टाळेबंदीमुळे व्यावसायिक आस्थापनं देखील गेली 3 महिने बंद होती तरीही त्यांना सरासरी वीज बिलांच्या नावाखाली अव्वाच्यासवा बिलं आकारली गेली आहेत. टाळेबंदीमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत, अनेक ठिकाणी पगारकपात झाली आहे तर अनेक आस्थापनांनी नोकरकपात सुरु केली आहे, अशा वेळेस जिथे उदरनिर्वाहाचीच शाश्वती नसताना तिथे ही वीजबिलं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरच प्रहार करणं आहे, असंही राज यांनी पत्रात म्हटलं आहे. कोरोनाची परिस्थिती अभूतपूर्व होती आणि त्यामुळे राज्यातील जनता, राजकीय पक्ष एकदिलाने सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि भविष्यात देखील राहतील पण ह्या अशा विषयांत जनता आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसेल अशी चुकीची समजूत सरकारने करून घेऊ नये, अशा शब्दांतही राज यांनी इशारा दिला आहे.

वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी

राज्याला महसुलाची अडचण आहे हे सर्वाना मान्यच आहे पण म्हणून जनतेच्या खिशाला त्यासाठी भोक पाडणं हा मार्गच असू शकत नाही. म्हणूनच ह्या विषयात मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ लक्ष घालावं आणि ह्या वीजबिलात तात्काळ सूट द्यावी तसंच ही सूट कोणत्याही प्रकाराने भविष्यात वसूल करायचा प्रयत्न करू नये. राज्य सरकारने महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थपानांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी अन्यथा ह्या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल. विषय संवेदनशील आहे आणि सरकार देखील संवेदनशीलपणे हा विषय हाताळेल, ह्याची मला खात्री आहे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Read  More कोव्हॅक्सिनची नागपुरमध्ये सुरूवात; समाधानकारक परिणाम

ताज्या बातम्या

हिमायतनगर तालुक्यातील असंख्य नाल्यातून अवैध वाळू चा उपसा तेजीत

हिमायतनगर (प्रतिनिधी ) : तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर परिस्थिती असल्याने परिसरातील वाळू माफियानी त्यांचा मोर्चा आता नाल्याकडे वळविला आहे दि.21 रोजी सरसम जवळील भोकर...

हिमायतनगर येथील बँक शाखेच्या आडमुठे धोरणामुळे शेतकर्‍यांना वेळेवर पिक कर्ज मिळेना

हिमायतनगर:-(ता.प्रतिनिधी )तालुक्यातील भारतीय स्टेट बँक शाखा हिमायतनगर येथील अधिकारी यांच्या आडमुठे धोरणामुळे शेतकर्‍यांना वेळेवर पिक कर्ज मिळत नसल्याने शेतकर्‍यांतून बँक शाखेच्या मनमानी कारभारा बाबत...

पोलिसांच्या आर्शिवादाने दारु धंदे जोमात,पोलिस निरक्षीक लक्ष देतील का? नारीकातून चर्चा

सांगोला (विकास गंगणे) कोरोनाने अवघ्या जगाला वेढले आहे. जगण्याचा एक अविभाज्य भाग म्हणून आधी कोरोनापासून दूर राहण्याची काळजी प्रत्येकजण घेताना दिसतो आहे. यात समाजातील...

सतत होणाऱ्या बंद मुळे व्यापारी व व्यवसाय धारकांचे कंबरडे मोडले, दुकानदारतून तीव्र नाराजी

श्रीपुर (दादा माने) : श्रीपुर ता माळशिरस गेल्या सहा महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे त्यामुळे गेली तीन महीने छोटे मोठे व्यवसाय पुर्णपणे बंद...

बंँक अधिकार्‍यांच्या बैठकीत कर्जासाठी त्रस्त झालेल्या शेतकर्‍याने रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा केला प्रयत्न

मंगळवेढा : मंगळवेढा पंचायत समितीमध्ये राष्ट्रीयकृत बंँक अधिकार्‍यांची शेतकर्‍यांच्या समवेत कर्जाविषयी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत चक्क कर्जासाठी त्रस्त झालेल्या एका शेतकर्‍याने अंगावर...

पंढरपुरात कलावंतांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

पंढरपूर : कलावंतांना कार्यक्रमांची परवानगी देण्यात यावी, कोरोनाच्या संकटामुळे काही महिन्यांपासून जत्रा, यात्रा, उत्सव बंद आसल्याने अडचणीत सापडलेल्या कलावंतांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी....

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात चार वर्षे बीएड करणार्‍यांनाच या नोकरीस पात्र ठरवले जाईल

जुन्या पदवी धारकांना 2030 नंतर शिक्षकाची नोकरी मिळणार नाही नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बीएडला चार वर्षे करण्यात आली आहेत. जुन्या पदवी धारकांना 2030...

‘केम छो वरळी’ : परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं

एक व्हिडीओ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला  ट्वीट ; मुंबईत प्रचंड पाऊस : वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये घरात पाणी शिरलं मुंबई : मुंबईमध्ये काल...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देणार -आमदार शहाजीबापू पाटील

चिकमहुद (वैभव काटे) : सांगोला तालुक्यांमध्ये दिनांक 16 सप्टेंबर व 17 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली...

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'नमस्कार,...

आणखीन बातम्या

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात चार वर्षे बीएड करणार्‍यांनाच या नोकरीस पात्र ठरवले जाईल

जुन्या पदवी धारकांना 2030 नंतर शिक्षकाची नोकरी मिळणार नाही नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बीएडला चार वर्षे करण्यात आली आहेत. जुन्या पदवी धारकांना 2030...

‘केम छो वरळी’ : परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं

एक व्हिडीओ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला  ट्वीट ; मुंबईत प्रचंड पाऊस : वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये घरात पाणी शिरलं मुंबई : मुंबईमध्ये काल...

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'नमस्कार,...

अशा आरोपांमुळे माझी प्रतिमा बिघडवली जात आहे-दीया मिर्झा

मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधीत ड्रग्ज केसमध्ये अनेक मोठ्या कलाकारांची नावे समोर येत आहे. ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोण पाठोपाठ अभिनेत्री...

लातूर जिल्ह्यात २४० नवे रुग्ण; रुग्णसंख्येची गती मंदावली

लातूर : गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच दि. २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येची गती मंदावल्याचे आढळून आले असून, मंगळवार दि. २२ सप्टेंबर रोजी...

राजस्थानचा रॉयल विजय; चेन्नई संघाला हे आव्हान पेलवले नाही

शारजा : संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने २१६ धावांचा डोंगर उभा केला. परंतु सॅमसन माघारी परतल्यानंतर राजस्थानच्या...

चीनला कुठल्याही प्रकारच्या युद्धात रस नाही- राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

चीन  : चीन हा एक विकसनशील देश आहे, चीन शांततेसाठी, सहकार्यासाठी वचनबद्ध असून चीनला कुठल्याही प्रकारच्या युद्धात रस नाही असे वक्तव्य राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग...

ललित-54 वाण यशस्वी : प्रत्येक हंगामात भेंडी लावा आणि अधिक नफा मिळवा

छत्तीसगड : छत्तीसगडच्या देवी राजमोहिनी कृषी महाविद्यालय व संशोधन केंद्राचे डीन डॉ. व्ही.के. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ललित-५४ प्रकारातील भेंडी ची चाचणी यशस्वी झाली आहे....

ऑक्सिजनचं प्रमाण तपासणारी कोणतीही अ‍ॅप्स डाऊनलोड करू नका : केंद्र सरकार

नवी दिल्ली: कोरोना काळात अनेक अ‍ॅप्सच्या मदतीनं डेटा चोरी करण्याचे प्रकार अगदी सर्रासपणे सुरू आहेत. कोरोनाची लागण झाल्यावर शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे...

भिवंडीतील मृतांचा आकडा २५ वर

ठाणे : भिवंडीत तीन मजली इमारतीचा एक भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांचा आकडा २५ झाला आहे. अद्यापही इमारतीच्या ढिगा-याखाली काही रहिवासीअडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत...
1,258FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...